घराजवळून दुचाकीची चोरी
By Admin | Updated: May 16, 2017 17:28 IST2017-05-16T17:28:29+5:302017-05-16T17:28:29+5:30
सिडक ोतील उत्तमनगरच्या गौरीशंकर मंगल कार्यालयाच्या परिसरातून महेश बाळकृष्ण थोरात यांची दुचाकी चोरीला गेली.

घराजवळून दुचाकीची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिडक ोतील उत्तमनगरच्या गौरीशंकर मंगल कार्यालयाच्या परिसरातून महेश बाळकृष्ण थोरात यांची दुचाकी चोरीला गेली. त्यांनी जवळपास महिनाभर शोध घेतल्यानंतर अंबड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, घराजवळ लावेलेली ब्राउन रंगाची टीव्हीएस ज्युपीटर एमएच १५, एफएच ७१७५ क्र मांकाची दुचाकी २२ एप्रिल रात्री ९ ते २३ एप्रिल सकाळी ७ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तेव्हापासून त्यांनी चोरी गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रयत्नांना अपयश आल्याने थोरात यांनी सोमवारी (दि.१५) अंबड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली असून, याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.