स्नेहनगरला दुचाकीस्वारांनी महिलेची मंगळसूत्र खेचले
By Admin | Updated: March 27, 2017 19:18 IST2017-03-27T19:08:21+5:302017-03-27T19:18:32+5:30
मैत्रिणीसमवेत रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने खेचून नेल्याची घटना

स्नेहनगरला दुचाकीस्वारांनी महिलेची मंगळसूत्र खेचले
नाशिक : मैत्रिणीसमवेत रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी एकाने खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़२६) रात्रीच्या सुमारास दिंडोरीरोडवरील स्नेहनगरमध्ये घडली़ याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहनगरमधील वास्तूलक्ष्मी अपार्टमेंटमधील रहिवासी संगीता भीमराव पवार या रात्री नऊ वाजेच्या सुमारास मैत्रिण तुळसा पगारे हिच्यासमवेत शतपावलीसाठी घरासमोरील रस्त्याने पायी जात होत्या़ त्यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने पवार यांच्या गळ्यातील दहा रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़
पवार यांच्या घरासमोर ही घटना घडला असून, दुचाकीवरील चेनस्नॅचर्स आता घराच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहेत़ या घटनेमुळे महिलांमध्ये घबराट पसरली असून, या चोरट्यांचा बदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़