तिरुपती हॉटेलजवळून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:35 IST2021-02-05T05:35:56+5:302021-02-05T05:35:56+5:30

दाभाडीत हाणामारी मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील न्यू प्लॉट भागात आईला शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने, ...

Two-wheeler stolen from Tirupati Hotel | तिरुपती हॉटेलजवळून दुचाकीची चोरी

तिरुपती हॉटेलजवळून दुचाकीची चोरी

दाभाडीत हाणामारी

मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील न्यू प्लॉट भागात आईला शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने, एकास बेदम मारहाण करण्यात आली. गुरुवारी (दि.२८) सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अंकुश सुरेश मानकर (३२, रा.न्यू प्लॉट दाभाडी) यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी विठ्ठल सोनू मानकर व इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. विठ्ठल मानकर व फिर्यादीची आई कल्पना सुरेश मानकर यांचे भांडण सुरू होते. आरोपी फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करीत असल्याने शिवीगाळ का करतो, असे म्हटल्याचा राग येऊन आरोपीने काठीने फिर्यादीचे डोके फोडले व जीवे ठार मारण्याचा दम दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler stolen from Tirupati Hotel