सटाण्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:08 IST2017-09-08T23:48:34+5:302017-09-09T00:08:31+5:30
शहरातील भुरट्या चोºयांबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील चोरीचे सत्र थांबविण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी गस्ती वाढवून चोरट्यांचा छडा लावावा या मागणीसाठी गुरुवारी नगरसेवक दीपक पाकळे, राकेश खैरनार, दत्त बैताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.

सटाण्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच
सटाणा : शहरातील भुरट्या चोºयांबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील चोरीचे सत्र थांबविण्यात पोलीस यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. पोलिसांनी गस्ती वाढवून चोरट्यांचा छडा लावावा या मागणीसाठी गुरुवारी नगरसेवक दीपक पाकळे, राकेश खैरनार, दत्त बैताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.
महिनाभरात सटाणा शहर व परिसरातून दहा ते बारा दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी तर चक्क पोलीस ठाण्याच्या आवारा उभी केलेली हंसराज पाकळे यांची एमएच ४१ एन ८१९७ या क्र मांकाची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. दुसºया घटनेत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जिजामाता कन्या विद्यालय पसिरातून दीपक सूर्यवंशी यांची दुचाकी (एमएच ४१-८८०८) चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.
औंदाणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार खैरनार यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेली पल्सर चोरट्यांनी चोरून नेली आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरामध्ये असुरिक्षततेची भावना निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. दोन आठवडयापूर्वी सटाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या निकिता लेडीज आर्टिकल या दुकानातून एका तरु णीने एक लाख रु पये हातोहात लांबविले. सटाणा पोलिसांत हा गुन्हा दाखल असून सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती मुलगी स्पष्टपणे दिसत असतानाही पोलीसांनी अद्याप या चोरीचा छडा लावला नसून सटाणा शहरात दिवसागणीक चोºयांचे वाढते प्रमाण पोलिसांच्या अकार्यक्षमतेचे प्रतिक असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सटाणा शहरातील वाढत्या चोºयांबाबत चौकशी करून पोलिसांना याबाबत कडक कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. यावेळी जीवन सोनवणे, संजय जाधव, अनिल पाकळे, गौरव वाघ, संदीप खैरनार, हरी जाधव, हेमंत शिंदे, पप्पू पाकळे, बबलू पाकळे, अनिल जाधव, पंकज मोगरे आदि उपस्थित होते.