लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : येथील सटाणा नाका भागातील एचडीएफसी बँकेजवळ दोघा पल्सर दुचाकीस्वारांनी एका बँक ग्राहकाची एक लाखाची रक्कम लुटून नेली. उत्तम भागा जाधव (६१) रा. नववसाहत सोयगाव याने छावणी पोलिसात फिर्याद दिली. त्यांनी सटाणा नाका भागातील एचडीएफसी बँकेतून एक लाखाची रक्कम काढली. ते घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात गाठले. मागे बसलेल्या इसमाने बॅग हिसकावली.पलायन केले. छावणी पोलिसांनी दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक नवले करीत आहेत.
दुचाकीस्वारांनी रक्कम लुटली
By admin | Updated: July 9, 2017 00:16 IST