अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:43+5:302021-03-04T04:26:43+5:30

--- बोरगडला ७५ हजारांची घरफोडी पंचवटी : प्रगतीनगर परिसरातील संग्राम सोसायटीमधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी ...

Two-wheeler killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

---

बोरगडला ७५ हजारांची घरफोडी

पंचवटी : प्रगतीनगर परिसरातील संग्राम सोसायटीमधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ७५ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. यप्रकरणी किरण पांडुरंग हिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरुळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. हिरे कुटुंबीय २७ फेब्रुवारी रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील बॅगेतील सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----

दुचाकींवर चोरट्यांचा पुन्हा डल्ला

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी चोरी होण्याचा सिलसिला थांबता थांबत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सरकारवाडा आणि अंबड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरट्यांनी दोन दुचाकी लांबविल्याचे समोर आले आहे.

नाशिकरोड येथील इमरान खान सलिम खान पठाण (रा.रंगोली सोसा.लॅमरोड) हे दि.२६ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त महापालिकेत आले होते. राजीव गांधी भवन येथील पूर्व दरवाजाच्या वाहनतळात त्यांनी अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ एचबी १३९९) उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना सिडकोतील सदाशिवनगर भागात घडली. संदेश बाळू दोंदे (रा.जेलरोड) यांनी एका दुकानासमोर त्यांची अ‍ॅक्सेस दुचाकी (एमएच १५ जीयू ४०१९) उभी केली असता चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler killed in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.