पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 00:25 IST2016-06-25T22:34:04+5:302016-06-26T00:25:01+5:30
कोनांबे : सिन्नर - घोटी मार्गावरील घटना

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सिन्नर : सिन्नर- घोटी मार्गावर
पिकअप जीपने दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तालुक्यातील कोनांबे येथील
युवक ठार झाला. लोणारवाडी शिवारात शुक्रवारी रात्री १०
वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
कोनांबे येथील सोमनाथ दत्तू डावरे (२५) हा युवक हीरो-होंडा स्प्लेंडरने (क्र. एमएच १५ सीएल ९८८१) कोनांबेकडे जात होता. लोणारवाडी शिवारात समोरून येणाऱ्या पिकअप जीपने (क्र. एमएच ०४ ईबी ८१८०) मामाश्री हॉटेलजवळ दुचाकीला धडक दिली. या अपघातात डावरे याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक पिकअप जीप सोडून फरार झाला.
याप्रकरणी शंकर उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पीकअप जीपचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. व्ही. भागवत अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)