बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: March 18, 2015 23:27 IST2015-03-18T23:26:47+5:302015-03-18T23:27:44+5:30
तपोवन चौफुलीवरील घटना; बसचालकावर गुन्हा दाखल

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
पंचवटी : द्वारकेकडून नवीन आडगाव नाक्याकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या परभणी डेपोच्या औरंगाबाद गंगाखेड बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी (दि़१८) पहाटे तपोवन क्रॉसिंगजवळील हॉटेल सुदीनसमोर घडली़ या अपघातात ठार झालेले प्रदीप नाना निकुंभ (४१) हे राज्य परिवहन महामंडळात बसचालक आहेत़
पंचवटी बस आगारात चालक म्हणून कामाला असलेले आगर टाकळी येथील प्रदीप नाना निकुंभ हे बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे बस डेपोत दुचाकीवरून (एमएच १५, एडी २०७३) तपोवन क्रॉसिंगजवळ रस्ता ओलांडत होते़ यावेळी सीबीएसकडून नवीन आडगाव नाक्याकडे जाणाऱ्या औरंगाबाद-गंगाखेड बसने (एमएच २०, बीएल २६९२) ने त्यांना जोरदार धडक दिली़
या धडकेमुळे प्रदीप निकुंभ हे रस्त्यावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले़ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ या अपघातप्रकरणी पंचवटी पोलिसांनी बसचालक श्यामराव यादवराव लोंढे यास ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)