बापू रामदास कुवर (२९) रा, वंजारवाडी ता. नांदगाव (हल्ली राहणार लहवीत स्टेशन ता. नाशिक) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. संशयित आरोपी काळी पिवळी गाडी मनमाडकडून मालेगावकडे भरधाव वेगात चालवून घेऊन जात असताना मनमाडकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच ४१ बी-४८१८) समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार साखरचंद भाऊराव कुवर (४८) रा. वंजारवाडी ता. नांदगाव यास गंभीर दुखापत होऊन ते ठार झाले. त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.
काळीपिवळीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:49 IST