कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:13+5:302021-06-20T04:11:13+5:30

--------------------------------- कृउबा आवारातून दुचाकीची चोरी मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून अज्ञात चोरट्याने दहा हजार रुपये किमतीची ...

Two-wheeler injured in container collision | कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

---------------------------------

कृउबा आवारातून दुचाकीची चोरी

मालेगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातून अज्ञात चोरट्याने दहा हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली आहे. या प्रकरणी अनिल निंबा बच्छाव (रा. कौळाने ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एम. एच. ४१ एडी ६३५५) ही चोरट्यांनी चोरून नेली आहे पुढील तपास हवालदार देशमुख करीत आहेत.

----------------------------

विवाहितेच्या छळाची तक्रार

मालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून २२ लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या साक्री येथील राहुल भटू देवरे याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जयश्री राहुल देवरे या विवाहितेने फिर्याद दिली आहे. माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Two-wheeler injured in container collision