इंदिरानगरला दुचाकीस्वार
By Admin | Updated: September 7, 2016 00:36 IST2016-09-07T00:35:58+5:302016-09-07T00:36:32+5:30
सैराट, नागरिक हैराणकारवाईची मागणी : पोलिसांनी मोहीम राबवावी

इंदिरानगरला दुचाकीस्वार
इंदिरानगर : दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करीत परिसरातील रस्त्यांवरून बेफान वेगाने धावणाऱ्या दुचाकीस्वारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या दुचाकीस्वारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वडाळा-पाथर्डी रस्ता, गजानन महाराज मार्ग, सावरकर चौक ते पेठेनगर, श्रीकृष्ण चौक ते राणेनगर चौफुली, मोदकेश्वर चौक ते बापू बंगल्यासह परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरून दुचाकीस्वार बेफान वेगाने ये-जा करतात. यामध्ये वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच सुमारे तीन ते चार महाविद्यालये आहेत. त्यातील काही युवकांनी दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कर्णकर्कश आवाज करीत बेफान वेगाने वाहने चालवित आहेत.
परिसरात सुमारे ६0 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. सकाळी, सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी ज्येष्ठ नागरिक परिसरातील रस्त्याचा वापर करतात. परंतु कर्णकर्कश आवाज करीत धावणाऱ्या दुचाकीस्वारामुळे त्यांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या वाहनधारकांमुळे पादचाऱ्यांना आणि मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले आहे.
त्यामुळे तातडीने या दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)