दुचाकीस्वाराने ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र
By Admin | Updated: May 15, 2017 17:02 IST2017-05-15T17:02:04+5:302017-05-15T17:02:04+5:30
माउलीनगर परिसरातील एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने खेचून पळवून नेल्याची घटना घडली

दुचाकीस्वाराने ओरबाडले महिलेचे मंगळसूत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : माउलीनगर परिसरातील एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने खेचून पळवून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी मनीषा संतोष अहिरे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनीषा अहिरे या रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शतपावलीसाठी बाहेर पडले असता दुचारीवरून आलेल्या चोरट्याने संधी साधून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून धूम ठोकली. विशेष म्हणजे चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये दुचाकीवरून दोन चोरटे जोडीने अशाप्रकारचे कृत्य करतात. मात्र रविराच्या घटनेच एकट्या दुचाकीस्वाराने अशाप्रकारे अहिरे यांच्या गळ्यातून मंगळसूत्र ओरबाडल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे या घटनेतून समोर आले आहे. दरम्यान, अहिरे यांच्या तक्रारीनुसार, त्या माऊलीनगर भागातील कॉलनीरोडने पायी जात असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.