दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर
By Admin | Updated: December 1, 2015 22:37 IST2015-12-01T22:37:06+5:302015-12-01T22:37:34+5:30
दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर

दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर
उपनगर : श्रीश्री रविशंकर रस्त्यावरील नारळाच्या बागेसमोर दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात झाल्याने एकजण जखमी झाला आहे.
रविशंकर मार्गावर नारळाच्या झाडाला दुचाकीने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली होती. शुक्रवारी पुन्हा रविशंकर मार्गावरील नारळाच्या बागेजवळ दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात होऊन परिसरात राहणारा अमन वर्मा हा युवक गंभीर जखमी झाला आहे. रविशंकर मार्गावरील रस्त्यामधील नारळाची झाडे वाहनधारकांच्या दृष्टीने धोकेदायक ठरत असून, ही झाडे त्वरित तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. (वार्ताहर)