महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून दुचाकीस्वार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:17 IST2021-09-23T04:17:37+5:302021-09-23T04:17:37+5:30

नाशिक : प्रसाद सर्कलजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ ...

The two-wheeler escaped by snatching the texture from the woman's neck | महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून दुचाकीस्वार फरार

महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून दुचाकीस्वार फरार

नाशिक : प्रसाद सर्कलजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ काढल्याची घटना मंगळवारी सांयकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित महिला छाया मधुकर भागवत (५५, राधाबाळ संकुल, गोरेराम गल्ली) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून काळ्याच रंगाचा पेहराव करून आलेल्या मजबूत बांध्याच्या एका दुचाकीस्वाराने प्रसाद सर्कलजवळील सोमेश्वर किराना दुकानाजवळ एका महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे डोरले असलेले ४ सोन्याचे मणी व काळे मणी असलेली २० ग्रॅम वजनाची चेन हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी छाया भागवत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Web Title: The two-wheeler escaped by snatching the texture from the woman's neck