वाहनाच्या धडकेने दुचाकीनचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:28+5:302021-09-02T04:29:28+5:30

काळी पिवळी जीप (क्र. एम.एच. १८/ ए.एन. १८६२) वरील चालक शेख रहीम शेख ...

Two-wheeler driver killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेने दुचाकीनचालक ठार

वाहनाच्या धडकेने दुचाकीनचालक ठार

काळी पिवळी जीप (क्र. एम.एच. १८/ ए.एन. १८६२) वरील चालक शेख रहीम शेख कादीर (रा. मालेगाव) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कुंदलगाव शिवारात दुनई नदीच्या पुलावर ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीला (क्र. एम.एच. १५/ एफ.वाय. २३७३) धडक दिली. या अपघातात चालक विकास रमेश मोरे (२५, रा. दरेगाव) हा जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेल्या आक्काबाई ऊर्फ सरला रमेश मोरे (४८, रा. दरेगाव) या जखमी झाल्या. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

फोटो - ३१ एम.एम.जी.२ - विकास रमेश मोरे

Web Title: Two-wheeler driver killed in vehicle collision