घराबाहेर लावलेली दुचाकी उपनगरला जाळली
By Admin | Updated: October 23, 2014 00:10 IST2014-10-23T00:09:16+5:302014-10-23T00:10:23+5:30
घराबाहेर लावलेली दुचाकी उपनगरला जाळली

घराबाहेर लावलेली दुचाकी उपनगरला जाळली
नाशिकरोड : उपनगर पगारे चाळ येथे घराबाहेर लावलेली पल्सर मोटारसायकलला आग लागून भस्मसात झाली आहे. मोटारसायकलला आग लागली की लावली याचा मात्र उलगडा झालेला नाही.
मोहन मधुकर गायकवाड यांनी जेलरोड लोखंडे मळा येथे राहणारे नातेवाईक मोहन मधुकर खरे यांची पल्सर मोटारसायकल (एमएच १५ सीए ८००६) रात्री कामानिमित्त घेऊन गेले होते. मोहन गायकवाड यांनी घराबाहेर लावलेली पल्सर मोटारसायकलला रात्री २.३० वाजेच्या सुमारास आग लागल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत दुचाकी आगीत भस्मसात झाली होती, फक्त सांगाडाच शिल्लक राहिला
होता. (प्रतिनिधी)