शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरात दुचाकींची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:37 IST

पांडवनगरी परिसरात मंगळवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी पेटवून पुन्हा दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

इंदिरानगर : पांडवनगरी परिसरात मंगळवारी (दि.२७) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी पेटवून पुन्हा दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, एका कारच्या काचाही फोडल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वीही अशा पद्धतीने मोटारींच्या काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.पांडवनगरी परिसरातील आकाश आरभ सोसायटीमध्ये राहणारे अजय उपासणी (४०) हे सोमवारी रात्री नियमितपणे सव्वादहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतले. राहत्या इमारतीच्या वाहनतळात त्यांनी स्प्लेंडर (एमएच १५, बीझेड ७५४०) ही दुचाकी उभी केली. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उपासनी यांना खिडकीबाहेर धूर व आगीच्या ज्वाला दिसू लागल्याने ते तत्क ाळ घरातून धावत खाली उतरले असता त्यांची दुचाकी आणि दुसरी दुचाकी (एमएच १५, बीजे ५१५७) जळत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ आरडाओरड करून नागरिकांना जागे केले. रहिवाशांनी घरातून पाणी आणत तत्काळ पेटलेल्या दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. दोन्ही दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचा कोळसा झाला. या जाळपोळीच्या घटनेत सुमारे २७ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी उपआयुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली. तसेच गुन्हे शोध पथकाला तातडीने संशयितांचा शोध घेत अटक करण्याचे आदेश दिले आहेत.सणासुदीच्या तोंडावर गुन्हेगारीगणेशोत्सव, मोहरम, नवरात्रोत्सव यांसारखे सण तोंडावर आले असून, परिसरात पुन्हा गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडणे असो किंवा सोसायट्यांच्या वाहनतळात उभी असलेली वाहने असो चोरट्यांकडून ती लक्ष्य केली जात आहेत. याबरोबरच दुचाकी, चारचाकी वाहने पेटवून देण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल वाढली आहे. यामुळे इंदिरानगर पोलिसांपुढे ऐन सणासुदीच्या काळात डोके वर काढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसFairजत्रा