वाहतूक पोलीस अधिकाºयाच्या अंगावर घातली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:50 IST2017-09-11T00:50:01+5:302017-09-11T00:50:01+5:30
पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या सूचनेनुसार आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़

वाहतूक पोलीस अधिकाºयाच्या अंगावर घातली दुचाकी
नाशिक : पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या सूचनेनुसार आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांच्या अंगावर गाडी घातल्याची घटना रविवारी (दि़११) सकाळी घडली़
यामध्ये भाले यांच्या पायास फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्यावर सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व वाहतूक शाखेचे कर्मचारी सकाळी साडेसहा ते नऊ वाजेच्या सुमारास आयटीआय सिग्नलजवळ विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया वाहनधारकांवर कारवाई करीत होते़ सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास एबीबी सर्कलवरून सातपूर गावाकडे भरधाव जाणारा दुचाकीस्वार मयूर विजय देवरे (२०, रा़ उमराणे, ता़ देवळा, जि़ नाशिक) हा विनाहेल्मेट जात असताना त्यास थांबण्याचा इशारा करण्यात आला़ मात्र त्याने आदेशाचे उल्लंघन करीत जोरात दुचाकी दामटवली व त्याचा ताबा सुटल्याने दुचाकी भाले यांच्या अंगावर गेली़ यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.