दोन वाहने जप्त : महसूल प्रशासनाकडून कारवाई; पांजरापोळ संस्थेला नोटीस मालेगाव महानगरपालिकेचा कत्तलखाना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:37 IST2018-01-31T00:37:14+5:302018-01-31T00:37:36+5:30
मालेगाव : भूसंपादनाच्या मोबदला प्रकरणातील जप्ती पाठोपाठ आता महसूल प्रशासनाने महापालिकेवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.

दोन वाहने जप्त : महसूल प्रशासनाकडून कारवाई; पांजरापोळ संस्थेला नोटीस मालेगाव महानगरपालिकेचा कत्तलखाना सील
मालेगाव : भूसंपादनाच्या मोबदला प्रकरणातील जप्ती पाठोपाठ आता महसूल प्रशासनाने महापालिकेवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. हरितपट्टा भागात अनधिकृतरित्या अकृषिक वापर करुन कत्तलखाना सुरू असल्यामुळे कत्तलखाना सील करण्यात आला तर लोकलेखा परिषदेचे दहा कोटी रूपये भरले नाहीत म्हणून मनपा मालकीची दोन वाहने ताब्यात घेण्यात आली आहे. पांजरापोळ संस्थेलाही नोटीस बजावण्यात आली असून दोन दिवसात अकृषिक वापर शुल्क भरला नाही तर कारवाई करण्यात येणार आहे.
विविध मालमत्ता कर बुडविणाºया व अकृषिक वापर करणाºया मालमत्ताधारकांविरोधात येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील सर्व्हे क्रमांक १०८/२ मध्ये हरितपट्टा असताना महापालिकेने अनधिकृत कत्तलखाना उभारून अकृषिक वापर सुरू केला आहे. याबाबत महिनाभरापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. २३ लाख २६ हजार ७६ रूपये शुल्क भरणे अपेक्षित होते; मात्र महापालिकेने लक्ष दिले नसल्यामुळे तहसीलदार देवरे यांनी मंगळवारी मनपाच्या कत्तलखान्याला सील लावले आहे. तसेच महापालिकेकडून सर्व्हे क्रमांक ५४४ व ५४८ मधील जागा १९३६ साली भाडेपट्ट्याने देण्यात आली आहे. भाडेपट्टा करार १९८८ साली संपला आहे. या पोटी चार कोटी रूपये भरण्याचे नागपूर आॅडिटने सुचविले होते; मात्र महानगरपालिकेने भरले नाहीत. सद्यस्थितीत व्याजासह दहा कोटी रुपये महानगरपालिकेकडे महसूल विभागाचे घेणे आहे. मनपाने केवळ पाच लाख रुपये अदा केले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी महसूल प्रशासनाने मंगळवारी मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांची दोन वाहने जप्त केली आहे.
कारवाईचा बडगा
विविध मालमत्ता कर बुडविणाºया व अकृषिक वापर करणाºया मालमत्ताधारकांविरोधात येथील तहसीलदार ज्योती देवरे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील सर्व्हे क्रमांक १०८/२ मध्ये हरितपट्टा असताना महापालिकेने अनधिकृत कत्तलखाना उभारून अकृषिक वापर सुरू केला आहे. महिनाभरापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती.