दापूर शिवारात दोन दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 17:57 IST2018-12-11T17:57:20+5:302018-12-11T17:57:26+5:30
सिन्नर : सिन्नर-अकोले रस्त्यावर दापूर शिवारातील धुळवड फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झाला, तर अन्य एक जखमी झाला. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. अपघातातील मृत दुचाकीस्वार सोनेवाडी (ता. सिन्नर) येथील आहे.

दापूर शिवारात दोन दुचाकींची धडक; एक ठार, एक जखमी
सिन्नर : सिन्नर-अकोले रस्त्यावर दापूर शिवारातील धुळवड फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार झाला, तर अन्य एक जखमी झाला. सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. अपघातातील मृत दुचाकीस्वार सोनेवाडी (ता. सिन्नर) येथील आहे.
सोनेवाडी येथील सदाशिव त्र्यंबक सहाणे (६०) हे बजाज प्लॅटिना मोटारसायकलने (क्र. एमएच १७ एएस ९९४१) सिन्नरकडून सोनेवाडीकडे जात असताना समोरून येणाऱ्या हिरा आय स्मार्ट दुचाकी (एमएच १६ पीक्यू ९२७५) यांच्यात समोरसमोर धडक झाली. या अपघातात सोनेवाडी येथील सदाशिव त्र्यंबक सहाणे यांचा मृत्यू झाला. तर दुसºया दुचाकीचा चालक जखमी झाला असून, त्याचे नाव समजू शकले नाही.
याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.