शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आठ दुचाकी हस्तगत : जुने नाशिकमधील दोघे चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:24 IST

या चोरट्यांकडून भद्रकाली व सरकारवाडा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

ठळक मुद्देभद्रकाली पोलिसांचे यश

नाशिक : लॉकडाऊन काळात सातत्याने नागरिकांच्या दुचाकी गायब करणारे दोघा चोरट्यांना भद्रकाली पोलीसांच्या पथकाने बेड्या ठोकून त्यांच्याकडून २लाक १५ हजार रुपये किंमतीच्या चोरी केलेल्या आठ दुचाकी हस्तगत करण्यास यश मिळविले आहे.लॉकडाऊन काळात व आता लॉकडाऊन शिथिलतेनंतर बेरोजगारीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांच्य दारासमोरून दुचाकी गायब करणारे जुने नाशिकमधील संशयित सुनील बाबासाहेब देशमुख (३०,रा.कोळीवाडा, सारडासर्कल) यास भद्रकाली पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे यांच्या आदेशान्वये ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा दुसरा साथीदार जाकीर अख्तर शेख (३६,खडकाळी) याच्या मदतीने महादेव कॉम्प्लेक्स सीबीएसवरून फिर्यादी विजय एकनाथ पालवा (२४) यांची प्लेझर मोपेड दुचाकी (एम.एच.१५ सीआर १९०४) चोरी केल्याची कबुली दिली. त्यास पोलिसांनी या गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्याही साथीदाराच्या मुसक्या बांधल्या. संशयित जाकीरकडून पोलिसांनी हिरो होंडा प्लेझर (एम.एच.१५ सीआर १९०४), हिरोहोंडा सीडी डिलक्स (एम.एच१५ सीडब्ल्यू ८७०४), बजाज एक्सीड (एम.एच४१ एल२५३९), हिरोहोंडा स्ट्रिट (एम.एच१५ एडी २९६७), महिंद्र गस्टो (एम.एच३९ एस ६७९६), हिरो होंडा पॅशन (एम.एच१५ अ‍ेडब्ल्यू९१९९), स्पेलेंडर (एम.एच१५ बीबी ९८७२ या दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. यापैकी एक चोरीची दुचाकी सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतून लंपास केली असून त्याचा गुन्हाही दाखल आहे. या चोरट्यांकडून भद्रकाली व सरकारवाडा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दाखल दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :theftचोरीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी