नाशिक : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद शिवारात असलेल्या शांतीनगरला दोघा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयितांनी एका युवकावर गोळीबार केल्याची घटना सोमवारी (दि.9) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेत किरण भडांगे नामक युवक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.भडांगे हा सकाळी बस स्टँडजवळ असलेल्या लॉन्ड्रीनजीक उभा असताना संशयित लखन पवार व त्याचा अन्य फड नामक एक साथीदार असे दोघे त्या ठिकाणी आले व त्यांनी पूर्ववैमनस्यातून भडांगे याच्यावर पिस्तुलातून एक गोळी झाडली. संशयितांनी केलेल्या गोळीबारात भडांगे यांच्या हाताला गोळी लागली असून, त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोघा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या संशयितांनी एका युवकावर केला गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 17:24 IST