नाशिकरोड दगडफेक प्रकरणी दोन समाजकंटकांना अटक
By Admin | Updated: November 8, 2014 23:46 IST2014-11-08T23:45:30+5:302014-11-08T23:46:01+5:30
नाशिकरोड दगडफेक प्रकरणी दोन समाजकंटकांना अटक

नाशिकरोड दगडफेक प्रकरणी दोन समाजकंटकांना अटक
नाशिकरोड : परिसरात शुक्रवारी दुपारी शहर वाहतुकीच्या बसेसवर दगडफेक करून दहशत माजविणाऱ्या दोन समाजकंटकांना नाशिकरोड पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे़ नाशिकरोड परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आंबेडकर रोड, देवळाली गाव गांधी पुतळा व विहितगाव येथील वालदेवी पुलावर तीन शहर वाहतुकीच्या बसेसवर दगडफेक करून काचा फोडून दहशत माजविण्यात आली होती़ या प्रकरणी संशयित सलाउद्दीन शेख (रा़देवळाली गाव), मंगेश पारखे (रा़देवळाली गाव, राजवाडा) या दोन समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे़ त्यांचा उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत़ शुक्रवारी विनाकारण शहर वाहतूक बसेसवर दगडफेक करून शांतताभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता़ मात्र या घटनेमुळे कुठेही काही अनुचित घटना घडली नव्हती़ (प्रतिनिधी)