कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या तिघांना अटक दोन संशयित आरोपी फरार

By Admin | Updated: May 18, 2014 23:48 IST2014-05-18T19:57:13+5:302014-05-18T23:48:20+5:30

नगरसूल : येवला- मनमाड रोडवर कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी फरार झाले.

Two suspected accused arrested for kidnapping truck trucks in Kigalda Shivar | कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या तिघांना अटक दोन संशयित आरोपी फरार

कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या तिघांना अटक दोन संशयित आरोपी फरार

नगरसूल : येवला- मनमाड रोडवर कासारखेडा शिवारात ट्रकचालकांना लुटणार्‍या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली, तर दोन आरोपी फरार झाले.
येवला- मनमाड महामार्गावरील आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील सावेर येथील ट्रकचालक रस्त्याच्या कडेला आपला ट्रक उभा करून खाली उतरला असता, पाच जणांच्या टोळक्यांनी त्यास चॉपरचा धाक दाखवून वीस हजार रुपये हिसकावून घेतले. वेळीच ट्रकचालकाने आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली. तालुका पोलिसांना तत्काळ घटनेची माहिती कळविण्यात आली. योगायोगाने त्याच सुमारास गस्ती पथकावर असणार्‍या पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने चोरट्यांचा पाठलाग केला असता. तीन आरोपींना पकडण्यात आले, तर दोन आरोपी पसार झाले.
ट्रकचालक शेराली दाऊद शेख रा. सावेर, इंदूर (मध्य प्रदेश) याने तालुका पोलिसांत फिर्याद दिल्याने, भगवान दिलीप परदेशी, रा. येवला, संतोष गौतम खरात, दीपक कनीराम पठारे, रा. कोपरगाव यांना अटक करण्यात आली, तर अमोल लक्ष्मण वारे (रा. कोपरगाव) व राहुल राजपूत (रा. शिर्डी) या फरार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राम भालसिंग, पोलीस हवालदार वनवे, पोलीस उपनिरीक्षक भरत राजपूत, कांबळे, शेख आदि करत आहे. दरम्यान, वारंवार घडणार्‍या रस्ता लुटीमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांना आजच्या तालुका पोलिसांच्या दक्षतेमुळे दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (वार्ताहर)
---

Web Title: Two suspected accused arrested for kidnapping truck trucks in Kigalda Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.