कळवणला बेहडी नदीपात्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 06:47 PM2019-11-23T18:47:31+5:302019-11-23T18:56:15+5:30

कळवण : शाळा सुटल्यानंतर प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढिदवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडलेल्या इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणार्या दोघा विद्यार्थ्यांचा कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदी नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.हे दोघे विद्यार्थी हे कळवण शहरातील आर के एम शाळेत शिक्षण घेत होते.

Two students die after drowning | कळवणला बेहडी नदीपात्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

स्वप्निल राजेंद्र ठाकरे

Next
ठळक मुद्दे कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

कळवण : शाळा सुटल्यानंतर प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढिदवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडलेल्या इयत्ता नववी व दहावीत शिक्षण घेणार्या दोघा विद्यार्थ्यांचा कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदी नदीपात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.हे दोघे विद्यार्थी हे कळवण शहरातील आर के एम शाळेत शिक्षण घेत होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात शाळा होती. शाळा सुटल्यानंतर इयत्ता नववीतील विद्यार्थी स्वप्नील राजेंद्र ठाकरे रा. शिवाजी नगर कळवण व इयत्ता दहावीतील विद्यार्थी मयूर दत्तु वाघ रा गणेश खेडगाव हे दोघे एक वाजेच्या सुमारास प्रकल्प तयार करण्यासाठी व वाढिदवस साजरा करण्यासाठी घरात सांगून घराबाहेर पडून कळवण शहरालगत असलेल्या बेहडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते.
या नदीपात्रात वाळू उपशामुळे मोठमोठे खड्डे पडले असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. व पाण्यात उडी मारल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. याठिकाणी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी हा प्रकार पिहला त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. पाणी खोल असल्याकारणाने त्यांना काढण्यासाठी थोडा वेळ लागला होता. त्यांना बाहेर काढल्यानंतर तात्काळ कळवण उपजिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शालेय विद्यार्थी नदीपात्रात बुडाल्याची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली असता नदीपात्राकडे बघ्यांची गर्दी जमली होती. तसेच उपजिल्हा रु ग्णालयात कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ?ड शशिकांत पवार , प्राचार्य एल डी पगार व शिक्षकवृंदासह, नातेवाई व नागरिकांनी गर्दी केली होती. इयत्ता नववीत शिकणारा स्विप्नल राजेंद्र ठाकरे हा मूळ राहणारा जुन्नर बोडरी ता बागलाण येथील रिहवाशी असून त्याची बहीण रोहिणी भरत खैरणार यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. शाळा सुटल्यानंतर तो घरी गेला होता परंतु प्रोजेक्ट तयार करण्यासाठी जात असल्याचे कारण सांगून तर दुसर्याने मित्राचा वाढिदवस असल्याचे कारण सांगून मित्रांसोबत बाहेर गेला होता . परंतु तो प्रोजेक्ट तयार करण्यासाठी न जाता पोहण्यासाठी बेहडी नदीवर गेल्याने हि दुर्दवी घटना घडली हि वार्ता कळवण शहरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 

 

Web Title: Two students die after drowning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.