शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोघे चोरटे ताब्यात : चोरीच्या दहा दुचाकी गुन्हे शाखेने केल्या हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:08 IST

गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे हे गस्तीवर असताना बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांची खात्रीशिर माहिती मिळाली. दोघे चोरटे गोल्फ क्लब पार्किंगजवळ येणार असल्याचे बातमीदाराकडून सांगितले गेले.

ठळक मुद्दे३ लाख ९० हजारांच्या दहा दुचाकी हस्तगत

नाशिक : शहर व परिसरातील रुग्णालय, महाविद्यालय तसेच व्यापारी संकुलांच्या परिसरातून दुचाकी चोरी होण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. दुचाकी चोरट्यांच्या मागावर गुन्हे शाखा असून गुन्हे शाखेच्या युनीट-१च्या पथकाला दोघा दुचाकीचोरांना ताब्यात घेण्यास यश आले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ९० हजारांच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.याबाबत गुन्हे शाखेने दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे हवालदार रवींद्र बागुल, आसिफ तांबोळी, विशाल काठे हे गस्तीवर असताना बागुल यांना गुप्त बातमीदाराकडून दुचाकी चोरट्यांची खात्रीशिर माहिती मिळाली. दोघे चोरटे गोल्फ क्लब पार्किंगजवळ येणार असल्याचे बातमीदाराकडून सांगितले गेले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सदर माहिती पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना सांगितली. त्यानंतर पथकाने  या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित समाधान उर्फ गोकुळ बळीराम गव्हाणे (२५), प्रशांत भगवान जाधव (२०, दोघे रा. पळसे), हे दोघे होंडा शाईन दुचाकीवरून आले. त्यांच्या दुचाकीला कुठल्याहीप्रकारे क्रमांक नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पथकाने त्यांना शिताफीने अटक केली. त्यांची कसूच चौकशी केली असता त्यांनी जिल्हा रूग्णालयाच्या वाहनतळातून त्यांच्या ताब्यातील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून तत्काळ पोलीस कोठडी मागितली. पोलीस कोठडीदरम्यान दोघा संशयित चोरट्यांनी शहरातील जिल्हा रूग्णालय वाहनतळ, धामणगाव येथील एस.एम.बी.टी वैद्यकिय महाविद्यालय आवार, बिटको रूग्णालय, देवळाली कॅम्प परिसरातील लॉन्स यासह बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ४ देवळाली पोलीस ठाणे, नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून तसेच वाडीवºहे हद्दीतून प्रत्येकी १ असे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ९० हजार रूपये किंमतीच्या दहा दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयbikeबाईक