स्थायी समितीच्या दोन जागांसाठी निवडणूक अटळ? पेच : मनीषा बोडके, सुनीता अहेरांचा माघारीस नकार
By Admin | Updated: November 10, 2014 23:52 IST2014-11-10T23:51:37+5:302014-11-10T23:52:12+5:30
स्थायी समितीच्या दोन जागांसाठी निवडणूक अटळ? पेच : मनीषा बोडके, सुनीता अहेरांचा माघारीस नकार

स्थायी समितीच्या दोन जागांसाठी निवडणूक अटळ? पेच : मनीषा बोडके, सुनीता अहेरांचा माघारीस नकार
नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या दोन जागांसाठी राष्ट्रवादीतील नाराजवीरांची समजूत काढण्यात अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना यश आले असले, तरी भाजपाच्या सदस्य मनीषा श्याम बोडके व कॉँग्रेसच्या सुनीता अनिल अहेर यांचे अर्ज अद्याप बाकी असल्याने प्रशासनाला या दोन रिक्त जागांसाठी निवडणूक घेणे अटळ ठरल्याची चर्चा आहे. दरम्यान, आठ दिवसांच्या आत नविन बैठकीची तारीख देण्याचे जाहीर करणाऱ्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सात दिवस झाल्यावरही तहकूब सभेची पुढील तारीख दिली नसल्याचे कळते. सुनीता अहेर यांनी त्यांचा अर्ज शिल्लक असल्याचे सांगितले असले, तरी प्रशासनाने कानावर हात ठेवत स्थायी समितीसाठी केवळ कृष्णराव गुंड, शैलेश सूर्यवंशी व मनीषा बोडके यांचेच अर्ज असल्याचे नमूद केल्याने घोळ वाढला आहे.