दोन रोटरॅक्ट क्लबची जागतिक विक्र मात नोंद
By Admin | Updated: August 8, 2016 00:04 IST2016-08-08T00:04:30+5:302016-08-08T00:04:52+5:30
दोन रोटरॅक्ट क्लबची जागतिक विक्र मात नोंद

दोन रोटरॅक्ट क्लबची जागतिक विक्र मात नोंद
सातपूर : संपूर्ण भारतात राबविण्यात आलेल्या ‘रोटरॅक्ट महादान’ या रक्तदान उपक्र माची जागतिक विक्र म म्हणून इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. या उपक्रमात नाशिक शहरातील रोटरॅक्ट क्लब गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निक (पाथर्डी फाटा), रोटरॅक्ट क्लब सपकाळ नॉलेज हब (त्र्यंबकरोड) यांनी उस्फूर्त सहभाग घेऊन रक्त संकलित केले होते. जागतिक उपक्रमात सहभाग दिल्याबद्दल या संस्थांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. गुरू गोविंदसिंग पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक संदीप गिते व सपकाळ नॉलेज हबचे रोटरॅक्ट अध्यक्ष कल्पेश रावल यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जास्तीत जास्त रक्तदान होण्यासाठी प्रयत्न केले होते.
रोटरी क्लबचा भाग असलेल्या रोटरॅक्ट क्लबच्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० चे वार्षिक पुरस्कार नुकतेच घोषित झाले. यामध्ये नाशिक, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, जळगाव, वडोदरा या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट विभागीय अध्यक्ष म्हणून नाशिक मधील केटीएचएमचे संस्थापक अध्यक्ष सुजीत हिरण यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. (वार्ताहर)