कारवर दुचाकी आदळून दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:15 IST2021-03-17T04:15:43+5:302021-03-17T04:15:43+5:30
--- १५ हजारांचे ऑक्सिजन सिलिंडर लांबविले नाशिक : शिंगाडा तलाव येथून प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे तीन इंडस्ट्रियल ऑक्सिजन ...

कारवर दुचाकी आदळून दोघे जखमी
---
१५ हजारांचे ऑक्सिजन सिलिंडर लांबविले
नाशिक : शिंगाडा तलाव येथून प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे तीन इंडस्ट्रियल ऑक्सिजन सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रेरणा विजय गायकवाड यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---
म्हसरुळला ३० हजारांची घरफोडी
नाशिक : म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीतील मखमलाबाद रोडवरील गामणे मळ्यातील सरगम रो-हाउसमधील रहिवाशी फिर्यादी गजानन सुरेश आहिरे (२६) यांचे बंद घराचे लॅच लॉक कशाच्या तरी साहाय्याने अज्ञात चोरट्यांनी उघडून सुमारे ३० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि.१५) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करत, ४३ इंचचा सोनी कंपनीचा टीव्ही, तांब्याचा हंडा, पितळी समई या वस्तू चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---