शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

वाळूचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने महालपाटणेत दोन ठार तर दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 19:46 IST

महालपाटणे : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चोरट्या मार्गाने जलद गतीने नेण्याच्या प्रयत्नात निंबोळा शिवरस्त्याला गिरणा उजव्या कालव्याच्या चारी क्र मांक आठ जवळ पलटी झाल्याने दोन युवक ठार तर दोन जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देचार दिवसापूर्वीच सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टर महसूल विभागाने दंड आकारून सोडला होता.

महालपाटणे : अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चोरट्या मार्गाने जलद गतीने नेण्याच्या प्रयत्नात निंबोळा शिवरस्त्याला गिरणा उजव्या कालव्याच्या चारी क्र मांक आठ जवळ पलटी झाल्याने दोन युवक ठार तर दोन जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.सविस्तर वृत्त असे की काल(दि.२६) दुपारी चारच्या सुमारास गिरणा उजव्या कालव्याच्या रस्त्याने बिगर नंबरचा पॉवरट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर वाळू भरून डोंगरगावकडे वेगाने जात होता.अरु ंद व उंच सखल रस्ता आण िट्रॅक्टरचा जलद गतीचा वेग यामुळे चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आण िट्रॅक्टर रस्त्याच्या खाली पंधरा ते वीस फूट खोल चारीत पलटी झाल्याने ट्रॉलीमध्ये वाळूवर झोपलेले विशाल नवरे,सचिन नवरे, सुनील सोनवणे, आण िअनिल नवरे सर्व राहणार ब्राह्मणगाव(कसाडपाडे) हे कामगार ट्रॉलीखाली दाबले गेले तर ट्रॅक्टर चालक तेथून फरार झाला.आजूबाजूच्या शेतकर्यांनी घटनास्थळी धाव घेत वाळूखाली दबलेल्या तरु णांना ट्रॉलीचे फाळके तोडून कसेबसे बाहेर काढले.त्यात सुनिल पवन सोनवणे (२२)हा युवक जागीच ठार झाला तर अनिल भिका नवरे(२१) या युवकाचे मालेगाव येथे खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.विशाल बापू नवरे आण िसचिन किसन नवरे यांच्यावर मालेगाव येथील खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.घडलेल्या घटनेची माहिती मिळताच कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली.तदनंतर ट्रॅक्टर मालक योगेश उत्तम भाटेवाल (महालपाटणे)यांचेवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि.सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.आय.राठोड,शेलार, पो.कॉ.निलेश सावकार आदी करत आहेत.सदर प्रकरणामुळे देवळा तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.वर्षभरात ट्रॅक्टर मालकावर अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाकडून चार वेळा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.चार दिवसापूर्वीच सदर अपघातग्रस्त ट्रॅक्टर महसूल विभागाने दंड आकारून सोडला होता.