उड्डाणपुलावर दोघे ठार
By Admin | Updated: March 12, 2017 00:16 IST2017-03-12T00:15:53+5:302017-03-12T00:16:17+5:30
नाशिक : शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथे उड्डाणपुलावर झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

उड्डाणपुलावर दोघे ठार
नाशिक : शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथे उड्डाणपुलावर झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओझरकडून नाशिककडे येणारा ट्रक (एम.एच.१८ एए९९४८) हा उड्डाणपुलावर टायर पंक्चर झाल्याने नादुरुस्त झाला. त्यामुळे चालकाने उड्डाणपुलावरील संरक्षक कठड्यालगत ट्रक उभा करून टायर बदलण्याचे काम सुरू केले. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (यूपी ७५ एम ५३५३) नादुरुस्त झालेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचे टायर खोलणाऱ्या चालक, वाहकाचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणांपैकी एकाची ओळख पटली असून, महेशसिंग गंगासिंग (वय २७, रा.उंबरी मध्य प्रदेश) दुसऱ्या मयत तरुणाचे वय २२ वर्षे असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
पाठीमागून धडक लेल्या ट्रकमध्ये बटाटा भरलेला होता व तो मुंबईकडे जात होता. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिका, पोलीस, क्रेन घटनास्थळी पोहचले. जखमींना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या अशोक मांगीलाल चव्हाण (वय २५, रा. रुई) याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक अमजद अब्दुल शकूर यास ताब्यात घेतले आहे. मुंबई नाका पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)