राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात पुलोदने लढविलेली विधानसभेची निवडणूक अविस्मरणीय आहे. या निवडणुकीत नाशिकमध्ये काँग्रेसकडून जयप्रकाश छाजेड, तर भाजपकडून डॉ. दौलतराव आहेर अशी लढत झाली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस विरोधात पुलोद आघाडी अशी निवडणूक रंगलेली असताना आम्ही तसे कच्चे लिंबू छाप कार्यकर्ते म्हणूनच या निवडणुकीत वावरत होतो. संघशाखेत जात असल्याने निवडणुकीत भाजपचे काम करायचे ठरले होते. मंडळातील अनेकजण डॉ. आहेर यांच्या प्रचाराला सुरुवात करून बसलो होतो; पण तेव्हा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रथम गणेशोत्सव मंडळाची मीटिंग घेऊन आपल्या हितसंबंधाविषयी चर्चा करून निर्णय होत असे. त्यामुळे सर्वांचीच अडचण झाली. त्यावर सर्वांनी मिळून उपाय काढताना काहींनी आहेर यांचे काम करायचे, तर काहींनी छाजेड यांचे काम करण्याचे ठरवले. त्यातून एकाच गल्लीत प्रचाराचे दोन मंडप पडले. मात्र कोणत्याही पक्षांचे नेते आले तर सर्व एकत्र येऊन गर्दी जमवित असू. एक दिवस वेगळीच गंमत झाली. रात्रीचे १२ वाजले असताना गल्लीत एका पक्षाची बडी मंडळी आली. त्यांनी केलेल्या सूचनांमुळे सर्वांना धक्काच बसला. त्यांनी वेगळीच समीकरणे सांगत निवडणुकीचे काम करण्याची सूचना केल्याने सर्वांनी एकमताने राजकारण्यांच्या सूचना फारशा गांभीर्याने न घेता गणेशोत्सवच जोरात करण्यावर भर दिला.गोविंद विधाते
एकाच मंडळाने टाकले दोन मंडप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:59 IST
राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात पुलोदने लढविलेली विधानसभेची निवडणूक अविस्मरणीय आहे. या निवडणुकीत नाशिकमध्ये काँग्रेसकडून जयप्रकाश छाजेड, तर भाजपकडून डॉ. दौलतराव आहेर अशी लढत झाली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस विरोधात पुलोद आघाडी अशी निवडणूक रंगलेली असताना आम्ही तसे कच्चे लिंबू छाप कार्यकर्ते म्हणूनच या निवडणुकीत वावरत होतो.
एकाच मंडळाने टाकले दोन मंडप
ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक