मालेगावी आढळले कोरोनाचे दोन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2022 01:53 IST2022-05-13T01:53:10+5:302022-05-13T01:53:31+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या मालेगावात दोन रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी मालेगावात कोरोना विषाणू असल्याचे समोर आले आहे.

मालेगावी आढळले कोरोनाचे दोन रुग्ण
मालेगाव : गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुक्त असलेल्या मालेगावात दोन रुग्ण आढळून आले आहेत. परिणामी मालेगावात कोरोना विषाणू असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक उपचार केंद्रांमधून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. गेल्या दोन दिवसांत १५१ रुग्णांची टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यात एक २६ वर्षीय महिला आशा वर्कर असून ती अब्बासनगरमधील रहिवासी आहे, तर दुसरी महिला ३० वर्षीय असून ती महेवीनगर येथे राहते. या दोन्ही महिलांना प्रभावी लक्षणे नसली तरी, महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषधोपचार केले आहेत.