सिन्नर तालुक्यातील दोन वृद्धांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 20:48 IST2020-06-29T20:47:54+5:302020-06-29T20:48:12+5:30

सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली व ठाणगाव येथील दोन वृद्धांचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.

Two old men from Sinnar taluka died | सिन्नर तालुक्यातील दोन वृद्धांचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील दोन वृद्धांचा मृत्यू

ठळक मुद्देकोरोनामुळे बळींची संख्या तीन : सर्तकतेचे आवाहन

सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली व ठाणगाव येथील दोन वृद्धांचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता तीन झाली आहे.
पांढुर्ली येथील भैरवनाथ नगर येथे राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचबरोबर ठाणगाव येथील ७२ वर्षीय वृध्दाचाही कोरोनाने बळी गेला. या दोघांना सिन्नरच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यांची प्रकृती बिघडल्याने या दोघांना नाशिक येथील जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी या दोघांची प्राणज्योत मालवली. यापूर्वी दापूर येथील नव्वद वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे तिघेही वृद्ध दगावले असल्याने वृद्ध व लहान मुलांनी बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Two old men from Sinnar taluka died