रासेगावजवळ अपघातात दोनठार

By Admin | Updated: June 4, 2016 23:25 IST2016-06-04T23:21:14+5:302016-06-04T23:25:34+5:30

रासेगावजवळ अपघातात दोनठार

Two odds in an accident near Rasegaon | रासेगावजवळ अपघातात दोनठार

रासेगावजवळ अपघातात दोनठार


नाशिक : पेठकडून येणाऱ्या नाशिक ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलिसांच्या गस्त पथकाची जीप रासेगावकडे जाणाऱ्या दोघा दुचाकींवर येऊन आदळल्याने अपघात घडला. या अपघातात सातपूर येथील एक दुचाकीस्वार जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पेठरोड वरून महामार्ग पोलिसांचे गस्त पथकाची टाटा सुमो (एम.एच.१५ अ‍ेअ‍े५२२७) भरधाव येत असताना धोकादायक वळणावरच चालकाचे नियंत्रण सुटल्याने पोलीस वाहन रस्त्यावर उलटल्याने रासेगावकडे जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक बसली.या धडकेत दुचाकी (एम.एच.१५ अ‍ेएन ७६४६)चा चक्काचूर झाला या दुचाकीवरील अशोकनगर, सातपूर भागातील रहिवासी गणेश शिवराम पगारे (४२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर याच दुचाकीवरील काशीनाथ पेंटाप्पा जय (४०, रा. प्रबुद्धनगर) हे गंभीर जखमी झाले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरही (एम.एच.१५ सीजी २५००) पोलिसांची सुमो येऊन आदळली.
सुदैवाने या दुचाकीवरील दोघे बचावले; मात्र वैभव शंकर धोंडगे (२०, रा.रासेगाव) याचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर श्याम भगवान ढगे (२३) याच्या पायाला व डोक्याला जबर मार लागला आहे. यापैकी दोघा रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून, एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याचे समजते.

Web Title: Two odds in an accident near Rasegaon