नाशिक : मल्हारखाण झोपडपीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे हत्त्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे व मंगेश किरण शेवरे या दोघांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने चार दिवसांची वाढ केली आहे़ दरम्यान, या गुन्ातील पाच संशयित अद्यापही फ रार आहेत़शुक्रवार, दि़ ९ रोजी सराईत गुन्हेगार भीम पगारेची गोळ्या मारून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने वार करून हत्त्या करण्यात आली़ संशयित किशोर बरू, योगेश शेवरे, नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे, रामदास चांगले, शरद मारुती चांगले, गणेश बाळासाहेब चांगले यांनी हत्त्या केल्याची फि र्याद मोनिका काळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली़ या हत्त्येप्रकरणी पोलिसांनी नीलेश शेवरे (३३) व मंगेश शेवरे या दोघा संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ दरम्यान, या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केले असता १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे़ (प्रतिनिधी)
्रपगारे हत्त्येतील दोघा संशयितांच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: May 16, 2014 00:08 IST