Two more farmers suicides | आणखी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
आणखी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नाशिक : जिल्ह्यात कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण कायम असून, नाशिक व सिन्नर तालुक्यात शेतकºयांनी आत्महत्या केल्याने पाच महिन्यांत शेतकºयांची संख्या ३२वर पोहोचली आहे.
नाशिक तालुक्यातील शिंदे  येथे राहणारे योगेश गौतम  जाधव (३५) या शेतकºयाने राहत्या घरातच सकाळी ८ वाजता गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्याच्या नावे शेतजमीन नसली तरी, त्याचे वडील गौतम जाधव
यांच्या नावे शिंदे शिवारात जमीन आहे. 
दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे घडली. किसन भागुजी हुळहुळे यांनी आपल्याच शेतातील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या नावावर शेतजमीन तसेच कर्ज असल्याचे त्यांच्या मुलांनी सांगितले. या दोन घटनांमुळे जिल्ह्णात शेतकरी आत्महत्या करणाºयांची संख्या ३२ इतकी झाली आहे. जिल्ह्णात यंदाही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कायम असून, दर महिन्याला सहा ते सात शेतकरी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. सरकारकडून आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही त्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.


Web Title:  Two more farmers suicides
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.