नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या बरोबर आता मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याने चिंंता व्यक्त केली जात आहे. नाशिक शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दुसºया घटनेत पंचवटीत एका बाधिताचा मृत्यू झाला. नाशिक शहरातीलच एका बाधिताच्या मृत्यूमुळे शहरात मृतांची संख्या पाच झाली आहे.रविवारी (दि.२४) रात्री आलेले काही अहवाल आणि सोमवारी (दि.२५) सकाळी प्राप्त झालेले चार अहवाल असे अकरा जण दुपारपर्यंत बाधित असल्याचे आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या आता ९९ झाली होती. त्यानंतर रात्री उर्वरित सोळा जणांचे अहवाल मिळाल्यानंतर आता शहरही हॉटस्पॉट ठरले आहे. अवघ्या चोवीस तासांत शहरात २७ बाधित आढळले आहेत. सोमवारी (दि.२५) सकाळी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे उपचार घेणाºया पोलीस कर्मचाºयाचा मृत्यू झाला. सदरचा कर्मचारी मालेगाव येथे कर्तव्य बजावत असताना त्याला त्रास होऊ लागल्याने संशयित रुग्ण म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान, शहरातील पंचवटीतील पेठ रोडवरील रामनगर येथील एका बाधिताचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या पत्नीचा पॉझिटिव्ह अहवालदेखील सोमवारी प्राप्त झाला आहे. सायंकाळी त्यांच्याच संपर्कातील १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह झाले आहेत. तर सायंकाळीच शिवाजीवाडीतील तीन आणि वडाळा येथील एकजण असे आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय शहरात अन्य भागातदेखील काही बाधित आढळले आहेत. यात जेलरोड येथील एक महिला वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी उल्हासनगर येथे गेली होती. परतल्यानंतर तिचा घसा स्राव नमुना पॉझिटिव्ह आला आहे.
शहरात आणखी दोन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:23 IST
शहरात कोरोनाबाधितांच्या बरोबर आता मृत्यूचे प्रमाण वाढू लागल्याने चिंंता व्यक्त केली जात आहे. नाशिक शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दुसºया घटनेत पंचवटीत एका बाधिताचा मृत्यू झाला. नाशिक शहरातीलच एका बाधिताच्या मृत्यूमुळे शहरात मृतांची संख्या पाच झाली आहे.
शहरात आणखी दोन जणांचा मृत्यू
ठळक मुद्देबाधितांची संख्या शंभरीपार : एकूण ११५; बहुतांशी रुग्ण जुन्यांच्या संपर्कातील