कटरचा धाक दाखवून दोन भ्रमणध्वनी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:11 IST2021-01-10T04:11:31+5:302021-01-10T04:11:31+5:30

दाभाडी शिवारातून सायकल चोरीला मालेगाव : दाभाडी शिवारातून पंधराशे रुपये किमतीची रेसर सायकल सुकलाल आनंदा पवार याने चोरून ...

Two mobile lamps in fear of the cutter | कटरचा धाक दाखवून दोन भ्रमणध्वनी लंपास

कटरचा धाक दाखवून दोन भ्रमणध्वनी लंपास

दाभाडी शिवारातून सायकल चोरीला

मालेगाव : दाभाडी शिवारातून पंधराशे रुपये किमतीची रेसर सायकल सुकलाल आनंदा पवार याने चोरून नेल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खंडेराव सुखदेव देवरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीची रेसर सायकल पवार याने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार मोरे हे करीत आहेत.

----------

विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : कल्याण येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह दोघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रियंका पंकज भदाणे राहणार संगमेश्वर या विवाहितेने फिर्याद दिली आहे. तिचा पती पंकज सुरेश भदाणे सासरा सुरेश शंभू भदाणे सासू सुनंदा सुरेश भदाणे यांनी माहेरून २० लाख रुपये आणावेत म्हणून शिवीगाळ मारहाण व शारीरिक मानसिक छळ करत छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास हवालदार देसले हे करीत आहेत.

Web Title: Two mobile lamps in fear of the cutter