दिंडोरीचे दोन, तर कोटमगावचा एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र

By Admin | Updated: May 21, 2014 23:07 IST2014-05-21T22:55:18+5:302014-05-21T23:07:03+5:30

सरकारी जागेवर अतिक्रमण, कराची थकबाकी, सरकारी लाभ घेतल्याचे आरोप

Two members of Dindori, one gram panchayat member of Kotamgaon disqualified | दिंडोरीचे दोन, तर कोटमगावचा एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र

दिंडोरीचे दोन, तर कोटमगावचा एक ग्रामपंचायत सदस्य अपात्र

सरकारी जागेवर अतिक्रमण, कराची थकबाकी, सरकारी लाभ घेतल्याचे आरोप
नाशिक : जिल्‘ातील महत्त्वाच्या असलेल्या दिंडोरी ग्रामपंचायत व कोटमगाव ग्रामपंचायतीतील तिघा ग्रामपंचायत सदस्यांना अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी निरनिराळ्या कारणांनी ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरविले आहे. दिंडोरी ग्रामपंचायतीत सत्तेसाठी अटीतटीचा संघर्ष असल्याने त्यावर या निकालांचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
दिंडोरी ग्रामपंचायतचे सदस्य नारायण गोतरणे व अण्णा कराटे यांच्या विरोधात तक्रार अर्ज आल्यानंतर त्याची चौकशी केल्यावर हा निकाल देण्यात आला आहे. नारायण गोतरणे यांनी स्वत:च्या मालकीची जागा अंगणवाडीसाठी भाडेकराराने देऊन त्याचे भाडे स्वीकारल्याच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने नारायण गोतरणे यांचे ग्रामपंचायत सदस्यपद अपात्र ठरविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अण्णा कराटे यांनी दिंडोरी ग्रामपंचायतीचा कर नोटीस देऊनही न भरल्याने त्यांचे सदस्यपद अपात्र ठरविण्यात आले आहे, तर कोटमगाव येथील ग्रामपंचायत सदस्याने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर सदस्यपद अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले. दिंडोरीत विजय देशमुख यांच्या पॅनलची सत्ता ९ विरुद्ध ८ मतांनी आली होती. त्याविरोधात चंद्रकांत राजे यांच्या पॅनलने अविश्वास ठराव आणला. तो मंजूर करण्यात येऊन आता राजे पॅनलची सरपंच पदावर सत्ता आहे. आता नेमक्या अटीतटीच्या वातावरणात दोन ग्रामपंचायत सदस्यांचे पद अपात्र ठरल्याने ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Two members of Dindori, one gram panchayat member of Kotamgaon disqualified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.