दोन बाजार समित्यांना मिळाली स्थगिती सरकारला दणका : पिंपळगाव, मंचरचा समावेश
By Admin | Updated: November 15, 2014 00:19 IST2014-11-15T00:18:59+5:302014-11-15T00:19:24+5:30
दोन बाजार समित्यांना मिळाली स्थगिती सरकारला दणका : पिंपळगाव, मंचरचा समावेश

दोन बाजार समित्यांना मिळाली स्थगिती सरकारला दणका : पिंपळगाव, मंचरचा समावेश
नाशिक : सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील शंभरहून अधिक बाजार समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याविरोधात आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी दंड थोपटले असून, नाशिक जिल्'ातील सातपैकी पिंपळगाव (ब) कृषी उत्पन्न बाजार समिती व पुणे जिल्'ातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्यास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने या प्रशासक नियुक्तीला स्थगिती दिल्याचे वृत्त आहे. नाशिक जिल्'ातील एकूण १४ पैकी सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई १२ नोव्हेंबर रोजीच्या आदेशान्वये करण्यात आली होती. या आदेशानुसार नाशिक जिल्'ातील पिंपळगाव (ब), कळवण, येवला, नांदगाव, चांदवड, सिन्नर व सटाणा या सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे सहायक निबंधक दर्जाचे प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. मुळातच मुदत संपल्याने रीतसर निवडणूक घेऊन नवीन संचालक मंडळाची निवड करणे अपेक्षित असताना, संचालक मंडळ बरखास्त करणे सयुक्तिक नसल्याचे कारण देत पिंपळगाव (ब) कृषी उत्पन्न बाजार समितीने या बरखास्तीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असता, न्यायालयाने सहकार खात्याच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती दिली आहे. पिंपळगाव (ब) कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नियुक्तीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या वृत्ताला विद्यमान अध्यक्ष व माजी आमदार दिलीप बनकर यांनी दुजोरा दिला आहे.