दोन सराईत गुन्हेगारांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: June 20, 2017 18:28 IST2017-06-20T18:28:05+5:302017-06-20T18:28:05+5:30

गुन्हे शाखा : सातपूरच्या तीन घरफोड्यांची कबुली, पाच तोळे सोने जप्त

Two lakh suspected criminals seize two lakhs of money | दोन सराईत गुन्हेगारांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन सराईत गुन्हेगारांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सातपूर परिसरातील अक्षय उत्तम भारती (१९, विधाते गल्ली, सातपूर) व विक्की उर्फ विकास सुरेश जाधव (२२, राधाकृष्णनगर, अशोकनगर, सातपूर ) दोघा सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली असून, त्यांच्याकडून पाच तोळे सोन्यासह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
शहर गुन्हे शाखा युनिट दोनमधील पोलीस नाईक मोतीलाल महाजन व पोलीस शिपाई योगेश सानप यांना सराईत गुन्हेगार अक्षय भारती व विकास जाधव यांनी सातपूर परिसरात तीन घरफोड्या केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार या दोघांना सिडकोतील त्रिमूर्ती चौकातून अटक केली असता त्यांनी तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे़ तसेच चोरलेल्या मुद्देमालापैकी ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, दुचाकी, अ‍ॅपल कंपनीचा फोन असा २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमालही या दोघांकडून जप्त करण्यात आला आहे़ या दोघांना न्यायालयात हजर केले असता बुधवार (दि़२१) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
 

Web Title: Two lakh suspected criminals seize two lakhs of money