पेठ तालुक्यात दोन लाखाच सागवान जप्त
By Admin | Updated: May 12, 2014 19:18 IST2014-05-12T19:17:02+5:302014-05-12T19:18:07+5:30
पेठ : तालुक्यातील आंबे परिसरातून गुजरात राज्यातील सागवान तस्करांनी लाकडीची तस्करी वनविभागासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे़

पेठ तालुक्यात दोन लाखाच सागवान जप्त
पेठ : तालुक्यातील आंबे परिसरातून गुजरात राज्यातील सागवान तस्करांनी लाकडीची तस्करी वनविभागासाठी डोकेदुखी ठरू पाहत असून गस्तीपथकाने जवळपास तीन ट्रकमध्ये सागवान चोरून नेतांना पकडल्याने या भागात गस्त वाढवण्याची गरज भासत आहे़ पेठ तालुक्यातील आंबे, झरी परिसरात सागवान शिल्लक असतांना आता गुजरात राज्यातील तस्करांनी महाराष्ट्रातील जंगल संपत्तीवर डोळा ठेवला आहे़ स्थानिक लोकांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर सागवान तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे़ दोन दिवसापूर्वी दाभाडी परिसरात वनविभागाचे गस्ती पथक रात्रीच्यावेळी गस्ती झालत असतांना कर्मचार्यांना तीन ट्रक जात असतांना दिसले़ वनकर्मचार्यांनी गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी पळून जाणयाचा प्रयत्न केला़ कर्मचार्यांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा पायदा घेऊन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले़ वनकर्मचार्यांनी सर्व वाहने पेठ कडे आणत असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या वाहनचालकांनी गाड्यावर दगडपेक करून समोरील काचा पोडल्या़ यामध्ये सागवान लाकडाचे सहा चौपट दोन लाख किंमतीचे लाकडे ट्रक क्रं़जीजे-१५-एक्स-२५३,जीजे-१५-एक्स-२२५६,जीजे-१५-एक्स-११३३ सह जवळपास आठ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे़ विभागीय वनव्यवस्थापक सावदेकर, सहाय्यक वनव्यवस्थापक घोरपडे आदींनी चौकशी केली़ यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत आहे़ (वार्ताहर)