शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
4
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
5
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
6
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
7
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
8
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
9
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
10
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
11
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
12
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
13
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
14
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
15
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
16
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
17
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
18
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
19
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
20
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी

वडाळागावात दररोज दोन लाख लिटर पाण्याची चोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:59 IST

वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता त्याची जागा आता घरांनी घेतली असून, परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर या परिसरांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ९० टक्के नागरिकांनी जलवाहिनीतून

ठळक मुद्देअनधिकृत नळजोडणी : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : नाशिक शहरात दररोज होणाऱ्या सुमारे साडेचार लाख लिटर पाणीगळतीपैकी एकट्या वडाळागावातील मेहबूबनगर परिसरात अनधिकृत नळजोडणीमुळे दररोज सुमारे दोन लाख लिटर पाण्याची चोरी होत असल्याची धक्कादायक माहिती असून, याकडे महापालिकेचे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याचा फायदा पाणी चोरांनी उचलला आहे.

वडाळागावात सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी शेती हा व्यवसाय होता त्याची जागा आता घरांनी घेतली असून, परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर या परिसरांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ९० टक्के नागरिकांनी जलवाहिनीतून अनधिकृतपणे नळजोडणी केली आहे. तर जवळपास दोन हजार घरांमध्ये अनधिकृत जोडणी करून घेतली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून या अनधिकृतपणे नळजोडणीतून महापालिकेच्या पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे महापालिकेला पाणीपट्टीतून मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महापालिकेने नळजोडणी अधिकृत करून घेण्याचे आवाहन करूनही अद्यापर्यंत कोणीही नळजोडणी अधिकृत करून घेतली नाही. नाशिक शहरात अशाप्रकारे अनधिकृत नळजोडणीतून सुमारे साडेचार लाख लिटर पाण्याची चोरी होत असताना एकट्या वडाळागावात गेल्या सात ते आठ वर्षांपासून दोन लाख लिटर पाण्याची चोरी सुरू आहे. एवढ्यावरच या भागातील पाणीप्रश्न भागत नसून, अपुºया पाण्याची ओरड करून या भागात टॅँकरद्वारेदेखील पाणीपुरवठा करावा लागत आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग अनधिकृत नळजोडणी तोडण्यास असमर्थ असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक