दोन लाख गॅसग्राहक आजपासून अनुदानाविना
By Admin | Updated: April 1, 2015 01:05 IST2015-04-01T01:04:36+5:302015-04-01T01:05:17+5:30
दोन लाख गॅसग्राहक आजपासून अनुदानाविना

दोन लाख गॅसग्राहक आजपासून अनुदानाविना
नाशिक : एक एप्रिलपासून गॅस ग्राहकाचे सिलिंडरवरील शासकीय अनुदान थेट बॅँक खात्यात जमा करण्याच्या तेल मंत्रालयाच्या निर्णयाची बुधवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्'ातील साडेदहा लाख गॅस ग्राहकांपैकी फक्त साडेआठ लाख ग्राहकांनीच आधार कार्ड व बॅँक खात्याची माहिती तेल कंपन्यांपर्यंत न पोहचती केल्याने सुमारे दोन लाख ग्राहक अनुदानापासून वंचित राहणार आहेत. जानेवारी महिन्यापासूनच शासन व तेल कंपन्यांकडून गॅस ग्राहकांनी आधार व बॅँक खात्याची सांगड घालण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले असता, त्याला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यातच बॅँकांनी या कामाबाबत अनुत्साह दर्शविल्याने हे काम काहीसे धिम्या गतीने पुढे सरकले. मात्र, एक एप्रिलपासून थेट बॅँकेतच अनुदान वर्ग करून, जे ग्राहक बॅँक खात्याची व आधार कार्डाची माहिती देणार नाहीत, त्यांचे अनुदान बंद करण्याचा निर्णय जाहीर झाल्यामुळे जिल्'ातील १० लाख ४९ हजार ६११ गॅस ग्राहकांपैकी आधार व बॅँक खात्याची माहिती फक्त ४ लाख ८५ हजार ६७० ग्राहकांनीच दिली आहे. त्याची टक्केवारी ४६ इतकी आहे. मात्र, बॅँकेत खाते असलेल्या गॅस ग्राहकांची संख्या ३ लाख ६७ हजार ७०७ म्हणजे ३५ टक्के आहे. या दोहोंमिळून ८१ टक्के ग्राहकांची माहिती तेल कंपन्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांनाच आता अनुदान मिळणार आहे. जिल्'ातील एक लाख ९६ हजार ७६३ ग्राहकांनी ३१ मार्चपर्यंत आपली माहिती सादर केली नाही.