मतदारयादी शुद्धीकरणानंतरही दोन लाख दुबार नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:08+5:302021-09-10T04:21:08+5:30

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदारयादी पडताळणीची मोहीम राबविल्यानंतरही याद्यांमध्ये दुबार नावे कायम असल्याचा दावा शिवसेनेने केला ...

Two lakh duplicate names even after voter list purification | मतदारयादी शुद्धीकरणानंतरही दोन लाख दुबार नावे

मतदारयादी शुद्धीकरणानंतरही दोन लाख दुबार नावे

नाशिक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदारयादी पडताळणीची मोहीम राबविल्यानंतरही याद्यांमध्ये दुबार नावे कायम असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. निवडणूक शाखेच्या प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये विधानसभेच्या नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व मतदारसंघ व इतर मतदारसंघातील एकूण दोन लाख ८७ हजार ४९३ दुबार मतदार याद्यांमधून वगळावे, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

निवडणूक विभागाने मतदारयादी शुद्धीकरण करून यादी तयार केली असल्याचा दावा केला होता. मनपा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच असा प्रकार समोर आल्याने यंत्रणेतील त्रुटी देखील समोर आल्या आहेत. शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, वसंत गिते, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, अजय बोरस्ते,गटनेते विलास शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

सर्वाधिक दुबार नावे नाशिक पश्चिममध्ये १ लाख २२ हजार २४२ इतके असून नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य मतदार संघात ही संख्या अनुक्रमे ८८ हजार ९३२ आणि ७६ हजार ३१९ इतकी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेली जिल्ह्यातील इतर मतदार संघातील दुबार मतदारांची संख्या मतदारसंघनिहाय पुढील प्रमाणे. नांदगाव (१२११७), मालेगाव (४५०७), मालेगाव बाह्य (११७१६), सिन्नर (८३९८), बागलाण (१२३५४), निफाड (९८९३), दिंडोरी (८६२४), नाशिक पूर्व(१२३५७),नाशिक मध्य(१२३४७ ) तर इगतपुरी ५२५२

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ : नांदगाव (७८८६), मालेगाव मध्य (६५५),मालेगाव बाह्य (८२१३), बागलाण(७१९५),सिन्नर(६७७६), निफाड (९१९५), दिंडोरी (८४८३),नाशिक पूर्व(८५९९),नाशिक मध्य (८९७०), नाशिक पश्चिम(१०२५१), देवळाली(८४७८) तर इगतपुरी(४०३१).

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात नांदगाव(६५७३), मालेगाव मध्य (२२३२), मालेगाव बाह्य (६६७४), बागलाण (५१२८), सिन्नर (४५३०),दिंडोरी(४७९१), नाशिक पूर्व (९१४२),नाशिक मध्य(१२२४२),नाशिक पश्चिम(१०७२४), देवळाली (५०८८) आणि इगतपुरी (२९४२).

Web Title: Two lakh duplicate names even after voter list purification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.