काठेगल्लीत दोन लाखांची घरफोडी

By Admin | Updated: June 24, 2017 17:58 IST2017-06-24T17:58:21+5:302017-06-24T17:58:21+5:30

बंद घरातील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्

Two lakh burglars in Kathgalli | काठेगल्लीत दोन लाखांची घरफोडी

काठेगल्लीत दोन लाखांची घरफोडी





लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बंद घरातील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास काठेगल्लीतील घोडेबाबानगरमध्ये घडली़
राजकमल रेसिडेन्सीमधील रहिवासी बाळासाहेब लक्ष्मण जाधव (४८) हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास कुटुंबीयांसोबत कामानिमित्त बाहेर गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून लाकडी कपाटात ठेवलेली रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, कागदपत्रे तसेच नामको बँकेच्या लॉकरची चावी, असा दोन लाख तीन हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two lakh burglars in Kathgalli