अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार
By Admin | Updated: December 22, 2015 00:24 IST2015-12-22T00:21:36+5:302015-12-22T00:24:16+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन ठार
नाशिक : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे़ रविवारी (दि़२०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास परिषदेसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत भास्कर बन्सी ढोन्नर (४३, रा. समशेरपूर, ता. अकोले, जि. अ.नगर) यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना नाशिक - पुणे महामार्गावरील पळसे येथे रविवारी (दि़२०) मध्यरात्री घडली़ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, या युवकाची ओळख पटलेली नाही़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)