शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:02 IST

वणी-सापुतारा राष्ट्रीय  महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून  धनाई माता मंदिर परिसरात रविवारी (दि.२८) पहाटे अज्ञात वाहनाने   दुचाकीला धडक दिल्याने  दुचाकीवरील दोन युवक ठार झाले.

ठळक मुद्देवणी-सापुतारा रस्त्यावर घडली दुर्घटना

वणी : वणी-सापुतारा राष्ट्रीय  महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून  धनाई माता मंदिर परिसरात रविवारी (दि.२८) पहाटे अज्ञात वाहनाने   दुचाकीला धडक दिल्याने  दुचाकीवरील दोन युवक ठार झाले.  सुरगाणा तालुक्यातील हतरुंडी येथील राजेश देविदास वाघमारे (२१) व धनराज वसंत वाघमारे (१७, दोघे रा. कळवड) हे दोघे दुचाकीने सापुतारा-वणी  रस्त्यावरून मार्गक्रमण करीत होते. धनाई मंदिर परिसरात अज्ञात  वाहनाने या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही युवकांना गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पहाटेच्या सुमारास घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थ व पोलिसांनी  तसेच १०८ या रुग्णवाहिकेने  धाव घेतली. रस्त्याच्या मधोमध झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वणी-सापुतारा, वणी-पिंपळगाव हा रस्ता राष्ट्रीय  महामार्ग झाल्यापासून गुजरात राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगात वाहने चालविण्याची स्पर्धाच असल्याचे चित्र दिसू लागले आहे.दुचाकीचालकांना याचा फटका बसत असुन अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. त्यात दूरवरच्या प्रवासात काही दुचाकीस्वारांकडून विनाहेल्मेट वाहन चालवून बेफिकिरी दाखविली जात आहे. 

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघातDeathमृत्यू