दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 23:16 IST2016-03-24T22:52:07+5:302016-03-24T23:16:23+5:30
दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार
मालेगाव : मालेगावनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
चाळीसगाव रस्त्यावर गिरणा डॅम फाट्याजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक देऊन तिच्यावरील स्वार राजेंद्र गोपीचंद धनगर (देवरे) (४९) याच्या मरणास व पाठीमागे बसलेल्या इसमाच्या दुखापतीस कारणीभूत ठरला म्हणून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काल दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भागवत नाना शिंदे, रा. सायगाव, ता. चाळीसगाव यांनी फिर्याद दिली. कारचालक (क्र. एमएच १९ एएक्स २८७५) याने दुचाकीला धडक देत झालेल्या अपघातात राजेंद्र
धनगर यांच्या मृत्यूस कारणीभूत
झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)